Judges 16:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एवढे म्हणून देवळाच्या मधोमध असलेले ते दोन खांब शमशोनने घरले. पूर्ण देवळाचा डोलारा या दोन स्तंभांवर उभा होता. आपल्या सर्व शक्तीनिशी त्या स्तंभांना त्याने जोराचा रेटा दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या मधल्या दोन खांबांवर ती इमारत आधारलेली होती त्यांतला एक उजव्या हाताने व दुसरा डाव्या हाताने धरून त्यांवर शमशोन टेकला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग ज्या मधल्या दोन खांबांवर मंदिर आधारलेले होते, त्यास शमशोनाने एका बाजूला त्याच्या उजव्या हाताने, आणि दुसर्‍या बाजूला डाव्या हाताने धरले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर ज्या दोन मधल्या खांबांवर ते सभागृह उभे राहिलेले होते, आणि ज्यांचा त्यास आधार होता, त्यांच्यातला एक शमशोनाने आपल्या उजव्या हाताने आणि दुसरा आपल्या डाव्या हाताने धरला.