Judges 16:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शमशोनचे भाऊ बंद आणि घरातील सर्व परिवार तेथे जमा झाला. त्याचा मृतदेह त्यांनी घेतला आणि त्याच्या वडीलांच्या कबरीतच त्याचाही अंत्यसंस्कार केला. सरा आणि अष्टावोल यांच्या दरम्यान हे कबरस्थान आहे. शमशोनाने वीस वर्षे इस्राएलसाठी न्यायनिवाडा केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याचे भाऊबंद व त्याच्या बापाचा सगळा परिवार आला व त्याला उचलून घेऊन गेला. सरा व एष्टावोल ह्यांच्या दरम्यान त्याचा बाप मानोहा ह्याच्या कबरस्थानात त्यांनी त्याला मूठमाती दिली. त्याने वीस वर्षे इस्राएलाचा न्यायनिवाडा केला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर त्याचा मृतदेह नेण्यासाठी त्याचे भाऊबंद आणि पित्याच्या घरचे सर्व कुटुंब खाली आले. त्यांनी त्याला परत आणले व सोराह आणि एष्टाओल यांच्या दरम्यान त्याचा पिता मानोहाला मूठमाती दिली होती, तिथेच त्यालाही मूठमाती दिली. त्याने वीस वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर त्याचे भाऊ व त्याच्या पित्याचे घरचे सर्व लोक यांनी खाली जाऊन त्यास उचलून आणले, आणि त्यास नेऊन सरा व अष्टावोल यामध्ये त्याचा पिता मानोहा याच्या कबरेत पुरले; त्याने तर वीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला होता.