Judges 16:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पलिष्ट्यांचे अधिकारी तिच्याकडे जाऊन तिला म्हणाले, “शमशोनच्या अचाट शक्तीचे रहस्य काय ते आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तू ते त्याच्याकडून युक्तीने काढून घे. म्हणजे मग त्याला जेरबंद कसे करायचे ते पाहता येईल. त्याला कह्यात आणता येईल. एवढे केलेस तर आम्ही तुला प्रत्येकी अठ्ठावीस पौंड चांदी देऊ.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पलिष्ट्यांचे सरदार त्या स्त्रीकडे जाऊन तिला म्हणाले, “त्याच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे आणि आम्हांला त्याच्यावर वर्चस्व कसे मिळवता येईल, हे तू त्याच्याकडून लाडीगोडीने काढून घे. म्हणजे आम्हांला त्याच्या मुसक्या बांधून त्याला जेरीस आणता येईल. आम्ही प्रत्येक जण तुला चांदीची अकराशे नाणी देऊ.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पलिष्ट्यांचे अधिकारी तिच्याकडे गेले व म्हणाले, “काहीतरी युक्ती कर आणि त्याच्या बळाचे रहस्य काय आहे आणि त्याच्यावर प्रबल होऊन, त्याला बांधून आपल्याला वश कसे करावे हे विचार. आम्ही प्रत्येकजण तुला चांदीची अकराशे शेकेल देऊ.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पलिष्ट्यांचे राज्याधिकारी तिच्याजवळ येऊन तिला म्हणाले, शमशोनाचे महान सामर्थ्य कशात आहे आणि आम्ही “त्याच्या शक्तीवर कशी मात करून त्यास बांधू, कशा प्रकारे आम्ही त्यास नमवू आणि त्याच्यावर वरचढ होऊ शकू ते युक्तीने विचार. तू हे करशील तर आम्ही प्रत्येकजण तुला अकराशे चांदीची नाणी देऊ.”