Judges 16:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा पलिष्टी अधिकाऱ्यांनी दलीलाला सात नव्या प्रत्यंचा आणून दिल्या. त्या अजून पुरत्या वाळल्या देखील नव्हत्या. दलीलाने त्यांनी शमशोनला जखडून टाकले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग धनुष्याच्या सात नव्या वाद्या घेऊन पलिष्ट्यांचे सरदार तिच्याकडे आले आणि तिने त्याला त्या वाद्यांनी जखडून टाकले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा पलिष्टी अधिकार्‍यांनी तिला धनुष्याच्या न सुकलेल्या सात ताज्या दोर्‍या आणून दिल्या आणि तिने त्याला बांधून टाकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर पलिष्ट्यांचे अधिकारी सात सालपटे जी सुकली नव्हती, अशी ते घेऊन दलीलाकडे आले, आणि तिने त्यास त्यांनी बांधले.