Judges 17:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मीखाने त्याला विचारले, “बाबा रे, तू कोण? कोठून आलास?” या तरुणाने उत्तर दिले, “मी यहूदा बेथलहेम येथील लेवी आहे. मी कोठेतरी आसरा शोधतोय”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मीखाने त्याला विचारले, “तू कोठून आलास?” त्याने उत्तर दिले, “यहूदाच्या बेथलेहेमातला मी एक लेवी आहे; आसरा मिळेल तेथे जाऊन राहावे म्हणून मी फिरत आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मीखाहने त्याला विचारले, “तू कुठून आलास?” तो म्हणाला, “मी यहूदीयातील बेथलेहेम येथील एक लेवी आहे आणि मी राहण्यासाठी एक ठिकाण शोधत आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मीखा त्यास म्हणाला, “तू कोठून आलास?” तेव्हा तो मनुष्य त्यास म्हणाला, “मी बेथलेहेमातला यहूदी लेवी आहे; आणि मला राहण्यासाठी जागा मिळावी म्हणून मी प्रवास करत आहे.”