Judges 18:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याकाळी इस्राएलवर कोणी राजा नव्हता. त्या सुमारास दान वंशातील लोक वस्ती करण्याच्या उद्देशाने जागा पाहात होते. त्यांना अजून स्वत:ची अशी भूमी नव्हती. इतर इस्राएलांप्रमाणे त्यांना त्यांचे वतन मिळाले नव्हते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवसांत इस्राएलाचा कोणी राजा नव्हता. त्या वेळेस दान वंशाचे लोक राहण्यासाठी जागा शोधत होते. कारण इतर इस्राएली लोकांबरोबर त्यांना त्यांच्या वाट्याचे वतन अद्याप मिळाले नव्हते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या दिवसामध्ये इस्राएलावर कोणी राजा नव्हता. आणि त्या दिवसामध्ये दान गोत्राचे लोक स्वतः स्थायिक होण्यासाठी जागा शोधण्याचा प्रयत्न करीत होते, कारण आतापर्यंत त्यांना इस्राएलच्या गोत्रांमध्ये त्यांचे वतन मिळाले नव्हते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या दिवसात इस्राएलावर कोणी राजा नव्हता, आणि त्या दिवसात दानाचा वंश वस्ती करण्यासाठी आपले वतन मिळवायाला पाहत होता; कारण त्या दिवसापर्यंत त्यास इस्राएलाच्या वंशांमध्ये वतनातला भाग मिळाला नव्हता.