Judges 18:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यापूर्वी येऊन लईश भोवतालचा प्रदेश पाहून गेलेले ते पाच जण आपल्या बरोबरच्या बाकीच्या लोकांना म्हणाले. “इथल्या एका घरात एफ्रोद आहे. शिवाय काही मूर्ती, एक कोरीव आणि चांदीची मूर्ती एवढे सगळे आहे. काय करायचे माहीत आहे ना? जाऊन आपल्या ताब्यात घ्यायचे”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा लईश प्रदेश हेरायला गेलेले पाच जण आपल्या बांधवांना म्हणाले, “ह्या घरात एक एफोद, तेराफीम (कुलदेवता), एक कोरीव मूर्ती आणि एक ओतीव मूर्ती आहे हे तुम्हांला माहीत आहे काय? आता काय करायचे ह्याचा विचार करा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर पाच व्यक्ती जे लईश हेरायला आले होते ते आपल्या दान भाऊबंदांना म्हणाले, “तुम्हाला माहीत आहे का या घरातील एका घरात एक एफोद, काही कुलदेवता आणि अनेक रुप्याचा मुलामा दिलेल्या मूर्ती आहेत? आता काय करावयाचे हे तुम्हाला माहीत आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा जी पाच माणसे लईश प्रदेश हेरावयास गेली होती, त्यांनी आपल्या नातेवाईकांना असे सांगितले की, “या घरामध्ये याजकाचे एफोद व कुलदेवता, आणि कोरीव मूर्ती व ओतीव धातूची मूर्ती आहेत; हे तुम्हाला माहीत आहे काय? तर आता काय करायचे ते तुम्ही ठरवा.”