Judges 18:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते पाच जण म्हणाले, “गप्प राहा, एक शब्दही काढू नकोस. आमच्या बरोबर चल. आमच्यातील वडीलधारा आणि याजक हो. आता तूच निवड कर फक्त एका माणसाचा पुरोहित होऊन राहाणे बरे की, इस्राएलांच्या एका आख्ख्या वंशाचे याजक होणे बरे?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते त्याला म्हणाले, “गप्प बस; तोंड बंद कर, आमच्याबरोबर चल; आमचा वडील व पुरोहित म्हणून राहा. एकाच मनुष्याच्या घरी पुरोहित होऊन राहण्यापेक्षा इस्राएलाच्या एखाद्या वंशाचा व कुळाचा पुरोहित होऊन राहणे अधिक बरे नाही काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी त्याला उत्तर दिले, “शांत राहा! एक शब्द सुद्धा बोलू नकोस. आमच्याबरोबर ये आणि आमचा पिता आणि पुरोहित हो. केवळ एका मनुष्याचा पुरोहित होऊन राहण्यापेक्षा, इस्राएलातील एक संपूर्ण गोत्र आणि वंशाचा पुरोहित होऊन राहणे अधिक चांगले नाही का?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी त्यास म्हटले, “तू शांत राहा! आपला हात आपल्या तोंडावर ठेव व आमच्याबरोबर चल, आणि आमचा बाप व आमचा याजक हो. एका मनुष्याचा याजक होऊन राहणे बरे की एका वंशाचा, आणि इस्राएलाच्या कुळाचा याजक व्हावे हे बरे? कोणते बरे?”