Judges 18:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा दानवंशजांनी जागा हेरण्यासाठी पाच शूर माणसे निवडली ती सरा आणि अष्टावोल या प्रांतातली होती. सर्व कुळांचे प्रतिनिधित्व ती करत होती. जागा पाहण्याचा आदेश मिळाल्यावर चांगल्या जागेच्या शोधार्थ हे पाचजण निघाले. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात आल्यावर मीखाच्या घराजवळ त्यांनी रात्रीपुरता मुक्काम केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा दानवंशजांनी आपल्या कुळातल्या लोकांतून पाच शूर वीर निवडले आणि त्यांना सरा व एष्टावोल येथून देश हेरून पाहण्यास पाठवले; त्यांना ते त्या प्रांताची पाहणी करा असे म्हणाले; ते एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापर्यंत आले व तेथे त्यांनी रात्रीचा मुक्काम केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून दानच्या लोकांनी आपल्या गोत्रातून सोराह व एष्टाओल येथील पाच प्रमुख व्यक्तींना देश हेरायला व भेद घेण्यास पाठविले. हे लोक सर्व दानी लोकांचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यांनी त्यांना म्हटले, “जा आणि देशाचा भेद घेऊन या!” मग त्यांनी एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात प्रवेश केला आणि ते मीखाहच्या घरी आले, जिथे त्यांनी रात्र घालविली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दानाच्या लोकांनी आपल्या सगळ्या वंशातून, सरा व अष्टावोल यांतून अनुभवी असे पाच शूर योद्धे पुरुष निवडून त्यांना देशाची टेहळणी व पाहणी करण्यासाठी पाठवले; तेव्हा त्यांनी त्यांना सांगितले, जा आणि तो देश पाहा. मग ते एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापर्यंत आले आणि त्यांनी रात्र तेथे घालवली.