Judges 18:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मीखाच्या घरापाशी ते आले तेव्हा त्यांना एका तरुण लेवी माणसाचा आवाज ऐकू आला. आवाज ओळखून ते घरापाशी थांबले. त्यानी लेवीला विचारले, “तू इथे कसा आलास? कोणी आणले तुला इथे? इथे तू काय करतोस?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते मीखाच्या घराजवळ असताना त्यांनी त्या तरुण लेव्याचा आवाज ओळखला तेव्हा ते तिकडे जाऊन त्याला विचारू लागले, “तुला येथे कोणी आणले? तू येथे काय करतोस? तुझे येथे काय काम आहे?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा ते मीखाहच्या घराजवळ पोहोचले, त्यांनी त्या तरुण लेवीचा आवाज ओळखला. त्यांनी त्याला बाजूला घेतले आणि विचारले, “तुला इथे कोणी आणले? या ठिकाणी तू काय करीत आहेस? तू येथे का आलास?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते मीखाच्या घराजवळ होते, तेव्हा त्यांनी त्या तरुण लेव्याचा शब्द ओळखला; यास्तव ते तिकडे वळून त्यास बोलले, “तुला इकडे कोणी आणले? आणि तू या ठिकाणी काय करतोस? तू येथे का आहेस?”