Judges 18:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दान लोकांनी या मूर्तीची दान शहरात स्थापना केली. गेर्षेामचा मुलगा योनाथन याला याजक म्हणून नेमले. गेर्षेम हा मोशेचा मुलगा. इस्राएल लोकांचा पाडाव होऊन त्यांनी बाबिलोनला बंदी म्हणून नेईपर्यंत योनाथन व त्याची मुले दान वंशजांचे याजक म्हणून पौरोहित्य करत होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दानवंशजांनी त्या कोरीव मूर्तीची स्थापना केली; देशाचा पाडाव होईपर्यंत गेर्षोमाचा मुलगा व मोशेचा नातू योनाथान व त्याचे वंशज दानवंशाचे पौरोहित्य करत होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग दानच्या लोकांनी आपणासाठी मूर्तीची स्थापना केली व गेर्षोमाचा पुत्र, मोशेचा नातू योनाथान आणि त्याच्या पुत्रास, त्या देशाचा त्याच्या शत्रूकडून पाडाव होईपर्यंत दानच्या गोत्राचे पुरोहित म्हणून नेमले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर दानाच्या लोकांनी आपल्यासाठी ती कोरीव मूर्ती केली; आणि मनश्शेचा पुत्र गेर्षोम याचा वंशज योनाथान तो व त्याची मुले, देश बंदिवासात जाईपर्यंत दानाच्या वंशाचे याजक होते.