Judges 19:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या काळी इस्राएल लोकांवर कोणी राजा नव्हता. एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशात अगदी आडबाजूला एक लेवी राहात असे. यहूदातील बेथलहेम नगरातील एक बाई त्याची दासी म्हणून त्याच्याजवळ राहात असे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या काळी इस्राएलात कोणी राजा नव्हता; तेव्हा एक लेवी एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातल्या मध्यभागात बेथलेहेम येथे उपरा म्हणून राहत असे; त्याने यहूदातील एक उपपत्नी ठेवली होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या दिवसामध्ये इस्राएलावर कोणी राजा नव्हता. लेवी वंशातील कोण एक मनुष्य एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशाच्या दूरच्या भागात राहत होता. त्याने यहूदीयातील बेथलेहेम मधील एक स्त्री आपली उपपत्नी करून घेतली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या दिवसात जेव्हा इस्राएलावर कोणी राजा नव्हता, तेव्हा असे झाले की कोणी लेवी एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशाच्या सर्वांत दूरच्या भागात राहत होता आणि त्याने आपल्याला यहूदातील बेथलेहेम नगरातील एक स्त्री उपपत्नी करून घेतली होती.