Judges 19:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण लेवीच्या मनातून आता तिथे मुक्काम करायचा नव्हता. आपली गाढवे आणि उपपत्नी यांच्यासह तो निघाला. वाटचाल करत तो यबूस (म्हणजेच यरुशलेम) पर्यंत आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण तो माणूस त्या रात्री तेथे राहीना; तो उठून मार्गस्थ झाला. तो खोगीर घातलेली आपली दोन गाढवे आणि आपली उपपत्नी ह्यांच्यासह यबूसच्या म्हणजे यरुशलेमेच्या जवळ आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु आणखी एक रात्र थांबण्यास तयार झाला नाही, तो पुरुष निघाला आणि आपली उपपत्नी व त्याचे खोगीर घातलेले दोन गाढव घेऊन यबूस (म्हणजे यरुशलेम आहे) येथे निघाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु लेवी ती रात्र घालवायला तयार झाला नाही. तो उठला आणि निघून गेला, मग यबूस म्हणजे यरूशलेमेच्या जवळ आला; तेव्हा त्याच्याबरोबर खोगीर घातलेल्या गाढवांची जोडी, आणि त्याची उपपत्नी होती.