Judges 19:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा लेवीने उत्तर दिले, “मी यहूदा मधील बेथलहेमला गेलो होतो. आता मी परत माझ्या घराकडे चाललो आहे. पण आज रात्री कोणीही आम्हाला राहायला बोलावले नाही. एफ्राईमच्या डोंगराळ भागात अगदी एका टोकाला मी राहातो. यहूदा बेथलहेमला गेलो होतो. आता घरी निघालो आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो त्याला म्हणाला, “आम्ही यहूदाच्या बेथलेहेमाहून निघालो आहोत आणि आम्हांला एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशाच्या मध्यभागात जायचे आहे. मी तेथलाच आहे; मी बेथलेहेम-यहूदा येथे गेलो होतो व आता घरी जात आहे; मला येथे कोणीही आपल्या घरात जागा देत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने उत्तर दिले. “यहूदीयातील बेथलेहेमातून एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशाच्या दूरच्या ठिकाणी जिथे मी राहतो तिथे जात आहोत. मी यहूदीयातील बेथलेहेम नगरात गेलो होतो आणि आता मी याहवेहच्या भवनात जात आहे. परंतु कोणीही मला रात्रीसाठी आपल्या घरात घेतलेले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा तो त्यास म्हणाला, “आम्ही यहूदाच्या बेथलेहेमाहून आलो आहोत, आणि आम्हांला एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशाच्या पलीकडच्या बाजूस जायचे आहे; तेथला मी आहे; यहूदातील बेथलेहेम येथे गेलो होतो, आणि मला परमेश्वर देवाच्या मंदिराकडे जावयाचे आहे; परंतु कोणी मला त्यांच्या घरात घेत नाही.