Judges 19:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यावर तो म्हातारा माणूस म्हणाला, “माझ्या घरी तुम्ही खुशाल मुक्कामाला येऊ शकता. काही लागले सवरले तर मी तुम्हाला देईन. पण या चौकात मात्र रात्रीचे राहू नका.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हातारा म्हणाला, “तुझे कल्याण असो. तुला जे हवे ते माझ्याकडे लागले. मात्र रस्त्यात मुक्काम करू नकोस.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुमचे कल्याण असो,” तो म्हातारा गृहस्थ म्हणाला. “तुम्हाला जे काही लागेल ते मला पुरवू द्या. फक्त रात्र चौकात घालवू नका.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा त्या म्हाताऱ्या मनुष्याने त्यास अभिवादन केले, “तुझ्याबरोबर शांती असो! मी तुझ्या सर्व गरजांची काळजी घेईन. फक्त चौकात रात्र घालवू नको.”