Judges 19:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे सगळे मजेत गप्पगोष्टी करत बसले आहेत तितक्यात गावातल्या काही वाह्यात गुंडांनी घराभोवती गर्दी केली. दार वाजवायला सुरुवात केली. म्हाताऱ्या घरमालकावर ते ओरडू लागले. “तुझ्याकडच्या पाहुण्याला बाहेर काढ. लैगिक मौजमजेसाठी तो आम्हाला हवा आहे.” असा एकच ओरडा त्यांनी चालवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते खुशीत असताना गावातल्या गुंडांनी येऊन त्या घराला गराडा घातला व दार ठोठावून त्या म्हातार्‍या घरमालकाला ते म्हणू लागले, “तुझ्या घरी आलेल्या माणसाला बाहेर काढ म्हणजे आम्ही त्याला जाणू.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते आनंदात असताना, गावातील काही अधम लोकांचे टोळके घराभोवती जमा झाले आणि दार जोरजोराने ठोकून त्या म्हातार्‍या मनुष्यास जो घराचा स्वामी आहे त्यास ओरडून म्हणू लागले, “जो पुरुष तुझ्या घरी आला आहे त्यास बाहेर काढ म्हणजे आम्ही त्याच्याबरोबर शारीरिक संबंध करू.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते आनंदात वेळ घालवत असताना, त्या नगरातले दुष्ट लोक, “घराला वेढून आणि दारावर ठोकून, त्या म्हाताऱ्या घरधन्याला म्हणू लागले की, जो मनुष्य तुझ्या घरात आला आहे, त्यास तू बाहेर काढ, म्हणजे आम्ही त्याच्याबरोबर समागम करू.”