Judges 19:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हाताऱ्याने बाहेर येऊन गुंडांना विनवले, “अरे बाबांनो असे भलते सलते करु नका. तो आज माझा पाहूणा आहे. असले दुष्ट पाप करु नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
घरधनी बाहेर जाऊन म्हणू लागला, “छे, छे! बांधवहो, मी हात जोडतो, असले दुष्कर्म करू नका; हा मनुष्य माझा पाहुणा आहे म्हणून असला निर्लज्जपणा करू नका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा घराचा स्वामी बाहेर गेला आणि त्यांना म्हणाला, “नाही, माझ्या बंधुजनांनो, असले नीच कृत्य करू नका, कारण तो पुरुष माझा पाहुणा आहे, तुम्ही हे घृणास्पद कृत्य करू नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तो मनुष्य, त्या घराचा धनी बाहेर त्यांच्याजवळ जाऊन त्यांना बोलला, “नाही, माझ्या भावांनो मी विनंती करतो अशी वाईट गोष्ट करू नका; हा मनुष्य माझ्या घरी पाहुणा म्हणून आला आहे, तर तुम्ही हा दुष्टपणा करू नका.