Judges 19:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण ती माणसे काही केल्या ऐकेनात. शेवटी लेवीने आपल्या उपपत्नीला बाहेर काढले आणि त्यांच्या हवाली केले. त्या गुंडांनी रात्रभर तिला छळले. तिच्यावर बलात्कार केला आणि पहाटे तिला तिथेे टाकून निघून गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी ती माणसे त्याचे ऐकेनात. मग त्या माणसाने आपल्या उपपत्नीला धरून त्यांच्याकडे बाहेर नेऊन सोडले; त्यांनी तिच्याशी रात्रभर कुकर्म केले आणि पहाट होईपर्यंत तिचे हालहाल केले. पहाट झाल्यावर त्यांनी तिला सोडले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु ती माणसे त्याचे ऐकेनात. मग त्या पुरुषाने आपल्या उपपत्नीला घेतले आणि तिला त्यांच्याकडे बाहेर पाठविले, आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि रात्रभर तिच्याशी कुकर्म केले व पहाटेस त्यांनी तिला जाऊ दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तथापि ती माणसे त्याचे ऐकायला तयार झाली नाहीत; तेव्हा त्या मनुष्याने आपली उपपत्नी घेऊन आणि बाहेर त्यांच्याजवळ आणली. मग त्यांनी तिच्यासोबत कुकर्म केले आणि सारी रात्र वाईट रीतीने वागवले आणि पहाट झाली असता तिला सोडले.