Judges 19:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सकाळी लेवी जायच्या तयारीसाठी म्हणून लवकर उठला. बाहेर पडायला म्हणून त्याने दार उघडले तर बाहेर ती पडली होती. तिचा हात उंबरठ्यावर पडला होता. ती त्याच्या दारात पडलेली त्याची उपपत्नी होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सकाळी तिच्या नवर्‍याने उठून घराचे दरवाजे उघडले व मार्गस्थ व्हावे म्हणून तो बाहेर आला, तेव्हा त्याची उपपत्नी दाराशी पडलेली व तिचे हात उंबरठ्यावर असलेले त्याच्या दृष्टीस पडले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सकाळी जेव्हा तिचा स्वामी उठला व घराचे दार उघडले आणि आपल्या प्रवासाला निघण्यासाठी बाहेर आला, तेव्हा त्याने त्याच्या उपपत्नीला घराच्या दारासमोर खाली पडलेली आणि तिचे हात उंबरठ्यावर असलेले त्याच्या दृष्टीस पडले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा सकाळी तिच्या धन्याने उठून घराची दारे उघडली, आणि आपल्या मार्गाने जायला तो बाहेर निघाला; तर पाहा, ती त्याची उपपत्नी घराच्या दाराजवळ पडलेली आणि तिचे हात उंबरठ्यावर होते.