Judges 19:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“चल ऊठ, आता जायचे आहे” असे तो तिला म्हणाला. पण ती कुठून उत्तर देणार? ती केव्हाच गतप्राण झाली होती. त्याने तिला गाढवावर लादले आणि तो घरी निघाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तिला म्हणाला, “ऊठ, आपण जाऊ;” पण ती काही उत्तर देईना. तेव्हा तिला गाढवावर घालून तो आपल्या गावी गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो तिला म्हणाला, “चल ऊठ, आपण निघू या.” परंतु काहीही उत्तर आले नाही. नंतर त्या मनुष्याने तिला गाढवाच्या पाठीवर घातले व तो आपल्या घरी गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा लेवीने तिला म्हटले, “ऊठ, म्हणजे आपण जाऊ.” परंतु तिने उत्तर दिले नाही; नंतर तो पुरुष तिला गाढवावर घालून निघाला आणि आपल्या ठिकाणी गेला.