Judges 19:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जो तो हे पाहून म्हणाला, “इस्राएलमध्ये कधीच असे घडले नव्हते. मिसर सोडल्यापासून आजतागायत असे झालेले कधीच आम्ही पाहिले नाही. तेव्हा यावर नीट विचार करुन, व चर्चा करुन. काय करायचे ते सांगा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते तुकडे घेऊन जाणार्या लोकांना तो म्हणाला, “तुम्ही सगळ्या इस्राएल लोकांना विचारा, इस्राएल लोक मिसरातून आल्या दिवसापासून आजपर्यंत असे कृत्य घडल्याचे तुम्ही पाहिले आहे काय? ह्यावर विचार करा आणि आपले मत सांगा.” (ते पाहणार्या सर्वांनी उद्गार काढले, “तेव्हापासून तर आतापर्यंत असले कृत्य घडल्याचे कोणी पाहिले नाही.”)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या प्रत्येकाने ते पाहिले, त्यांनी एक दुसर्यांना म्हटले, “इस्राएली लोक इजिप्तमधून आले, तेव्हापासून आजवर अशी घटना पाहिली नाही किंवा केली नाही. आपण काहीतरी केलेच पाहिजे! चला बोलू या!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्या प्रत्येकाने ते पाहिले, त्यांनी म्हटले, “मिसर देशातून इस्राएल लोक पुन्हा आले, त्या दिवसापासून आजपर्यंत यासारखी गोष्ट घडली नाही, आणि कधी दृष्टीस पडली नाही; याविषयी तुम्ही विचार करा! आम्हांला सल्ला द्या! काय करावे ते आम्हांला सांगा!”