Judges 20:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग सर्व इस्राएल वंशातील शंभर पुरुषामागे दहा. हजारामागे शंभर आणि दहा हजारातून हजारजण निवडू. ते सैन्याला रसद पोचवतील. आपले सैन्य बन्यामीनांच्या गिबा शहरावर तुटून पडेल. या बेशरम कृत्याबद्दल त्यांचे पारिपत्य करील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग सर्व इस्राएल वंशातील शंभर पुरुषांमागे दहा, हजारामागे शंभर, आणि दहा हजारांमागे एक हजार असे पुरुष निवडू; ते सैन्यासाठी भोजनसामग्री आणतील व आपण बन्यामिनाचे गिबा येथे जाऊन तेथील लोकांनी इस्राएलामध्ये जे निर्लज्ज कृत्य केले आहे त्याबद्दल त्यांचे पारिपत्य करू.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपण इस्राएलाच्या सर्व गोत्रांतून शंभरातून दहा आणि हजारातून शंभर आणि दहा हजारातून एक हजार पुरुष निवडू आणि हे सैन्याकरिता भोजनसामुग्री आणतील. जेव्हा ते सैन्य बिन्यामीनच्या गेबा येथे पोहोचेल, तेव्हा इस्राएलात त्यांनी केलेल्या भयंकर घृणास्पद कृत्याबद्दल शिक्षा करेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आम्ही इस्राएलाच्या सर्व वंशांतून शंभरातली दहा माणसे व हजारातून शंभर, व दहा हजारातून एक हजार, इतकी माणसे निवडू. ती या लोकांसाठी अन्नसामग्री आणतील, म्हणजे मग ते जाऊन बन्यामिनाच्या गिब्याने इस्राएलात जे दुष्टपण केले, त्यानुसार त्यांना शिक्षा करतील.”