Judges 20:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा त्यांना गिबा शहरातून बाहेर काढून आमच्या हवाली. करा. ते लोक आम्हाला द्या म्हणजे आम्ही त्याना ठार मारु इस्राएलींमधून ही कीड नाहीशी केली पाहिजे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गिब्यातील त्या बदमाशांना आमच्या हवाली करा म्हणजे आम्ही त्यांना ठार मारून इस्राएलातून ही दुष्टाई काढून टाकू.” पण बन्यामिनी लोक आपले भाऊबंद इस्राएल लोक ह्यांचे म्हणणे ऐकायला तयार होईनात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गिबियाह नगरातील या दुष्कर्म्यांना आमच्या स्वाधीन करा म्हणजे आम्ही त्यांना ठार मारू आणि इस्राएलातील दुष्टता काढून टाकू.” परंतु बिन्यामीन लोक आपले भाऊबंद इस्राएलींचे ऐकेनात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आता तुम्ही गिब्यांतली जे दुष्ट लोक आहेत ते आम्हांला काढून द्या, म्हणजे आम्ही त्यांना जीवे मारू आणि इस्राएलातून दुष्टाई पूर्णपणे काढून टाकू.” परंतु बन्यामिनी लोकांनी आपले भाऊबंद इस्राएली लोक यांचे ऐकले नाही.