Judges 20:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएल लोकांनी परमेश्वराला प्रश्न विचारला (त्या काळी परमेश्वराच्या कराराचा कोश बेथेल येथे होता)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि अहरोनाचा नातू, एलाजाराचा मुलगा फिनहास हा त्या काळी त्या कोशाच्या सेवेस असे.) लोकांनी परमेश्वराला विचारले, “आमचे भाऊबंद बन्यामिनी ह्यांच्याशी लढायला पुन्हा एकदा जावे काय? किंवा लढण्याचे सोडून द्यावे?” परमेश्वराने उत्तर दिले, “चाल करून जा; कारण उद्या मी त्यांना तुमच्या हाती देईन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एलअज़ाराचा पुत्र व अहरोनाचा नातू फिनहास हा तिथे कोशापुढे सेवा करीत होता.) त्यांनी विचारले, “आम्ही पुन्हा जाऊन आमचा इस्राएली भाऊबंद बिन्यामीन याविरुद्ध लढावे किंवा नाही?” याहवेहने उत्तर दिले, “जा, कारण उद्या मी त्यांना तुमच्या हातात देणार आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि अहरोनाचा पुत्र एलाजार याचा पुत्र फिनहास त्या दिवसात त्याची सेवा करत होता. “आम्ही आपला बंधू बन्यामीन याच्या लोकांविरुद्ध लढण्यास परत जावे काय किंवा थांबावे?” तेव्हा परमेश्वर देव म्हणाला, “तुम्ही चढून जा; कारण उद्या मी तुम्हाला त्यांचा पराजय करण्यास मदत करीन.”