Judges 20:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बन्यामीनांचे सैन्यही गिबा शहराबाहेर पडून इस्राएलींसमोर युध्दाला सामोरे आले. यावर इस्राएल लोकांनी एकाएकी लढाईतून पाठ फिरवली आणि ते पळ काढू लागले. बन्यामीन त्यांचा पाठलाग करत त्यांना ठार मारण्यासाठी त्याच्या मागे गेले. या युक्तीने इस्राएल लोकांनी बन्यामीन सैन्याला आपल्या शहरापासून पार दूरवर पळवत नेले. बन्यामीनांनी पूर्वी प्रमाणेच या हल्लात इस्राएलाचे सैन्य कापून काढायला सुरुवात केली. रस्त्यात, शेतात अशी जवळपास तीस माणसे त्यांनी ठार केली. येथून एक रस्ता बेथेल शहराकडे आणि एक गिबाकडे जात होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा बन्यामिनी त्या लोकांशी सामना करायला बाहेर पडले; त्या वेळी इस्राएल लोकांनी त्यांना आपल्यामागे नगरापासून बरेच दूर झुलवत नेले; खुल्या मैदानातून एक हमरस्ता बेथेलास व दुसरा गिब्याकडे जातो, त्यांच्या दरम्यान पूर्वीप्रमाणेच बन्यामिन्यांनी हाणमार सुरू केली व इस्राएलांपैकी सुमारे तीस माणसे त्यांनी मारली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बिन्यामीन लोक त्यांच्यावर हल्ला करण्यास बाहेर आले आणि माघार घेत असलेल्या इस्राएली लोकांनी त्यांना शहरापासून दूर नेले. पूर्वी केले त्याप्रमाणे बिन्यामीन पुरुषांनी इस्राएली पुरुषांना बेथेल आणि गिबियाह यांच्यामधील मार्गावर ठार करण्यास सुरुवात केली. तेव्हा इस्राएलांपैकी सुमारे तीस माणसे ठार झाली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा बन्यामीनी लोक गेले आणि इस्राएल लोकांविरूद्ध लढले आणि त्यांना नगरापासून काढून घेऊन दूर नेण्यात आले. त्यांनी काही लोकांस मारण्यास सुरवात केली. त्यातला एक रस्ता बेथेलास आणि दुसरा गिब्याकडे जातो, त्यामध्ये इस्राएलांपैकी सुमारे तीस पुरुष शेतात त्यांनी मारले;