Judges 20:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पूर्वीप्रमाणेच आपला जय होत आहे असे बन्यामीनांना वाटले. इस्राएल पळ काढत होते. पण ती त्यांची एक चाल होती. बन्यामीनांना शहरापासून लांब रस्तयावर यायला लावायचे असा त्यांचा डाव होता. प्रथम यहूदाने जावे असे परमेश्वराने सांगितले
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बन्यामिनाचे लोक म्हणाले, “आता पहिल्याप्रमाणेच आपल्यासमोर त्यांचा मोड होत आहे.” पण इस्राएल लोक म्हणाले, “आपण पळण्याचे सोंग करून त्यांना नगरापासून दूर हमरस्त्यांपर्यंत झुलवत नेऊ.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग बिन्यामीन लोक बोलू लागले, “आपण पहिल्याप्रमाणेच त्यांचा पराभव करीत आहोत!” परंतु इस्राएली लोक म्हणाले, “चला आपण पळण्यास सुरू करू आणि त्यांना शहरापासून दूर मार्गावर घेऊन येऊ.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बन्यामिनी लोकांनी म्हटले, “त्यांचा पराजय झाला आहे, आणि पहिल्यासारखे ते आमच्यापुढून पळून जात आहेत.” परंतु इस्राएली सैन्य म्हणाले, “आपण मागे पळू आणि त्यांना नगरातल्या रस्त्या पासून दूर काढून आणू.”