Judges 20:34 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलच्या दहाहजाराच्या निवडक सैन्याने गिबावर चढाई केली. तेथे चांगलेच तुंबळ युध्द झाले. या भीषण हल्ल्याची बन्यामीनांना आधी जराही चाहूल लागली नव्हती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सर्व इस्राएलातले निवडक दहा हजार लोक गिब्यावर चालून आले व तेथे तुंबळ युद्ध जुंपले. आपल्यावर अनर्थ येऊन ठेपला आहे ह्याची बन्यामिन्यांना कल्पना नव्हती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग इस्राएलातील निवडलेले दहा हजार तरुण पुरुष गिबियाहवर चालून आले. युद्ध एवढे भयंकर झाले की आपल्यावर मोठा अनर्थ येऊन ठेपला आहे, याची बिन्यामीन लोकांना काही कल्पना नव्हती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सर्व इस्राएलातले निवडलेले दहा हजार पुरुष गिब्यापुढे आले आणि भयंकर लढाई झाली, तथापि बन्यामिन्यांना समजले नव्हते की, आपत्ती आपल्याजवळ येऊन ठेपली आहे.