Judges 20:36 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा आपण हरलो आहोत हे बन्यामीनांच्या लक्षात आले. इस्राएल लोकांचे सैन्य आता मागे हटले. कारण गनिमी काव्याने छापा घालण्यावर त्यांची भिस्त होती. त्यांची माणसे गिबा येथे लपून बसली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा आपला मोड झाल्याचे बन्यामिन्यांच्या लक्षात आले. इस्राएल लोक बन्यामिन्यांपुढून मागे सरले, कारण गिब्याजवळ दबा धरून बसलेल्या लोकांवर त्यांची भिस्त होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा बिन्यामीन लोकांनी पाहिले की त्यांच्या पराभव झाला आहे. इस्राएली लोक हे बिन्यामीन लोकांपुढून बाजूला झाले, कारण त्यांचा गिबियाहजवळ दबा धरून असलेल्या लोकांवर भरवसा होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बन्यामिनी लोकांनी पाहिले की आपण पराजित झालो आहोत. हे असे झाले की इस्राएली मनुष्यांनी गिब्यावर जे दबा धरून ठेवले होते, त्यांचा भरवसा धरला म्हणून ती बन्यामिनी मनुष्यांपुढून बाजूला झाली.