Judges 20:37 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दडून राहिलेले लोक गिबात घुसले आणि त्यांनी शहरातील एकूण एक सर्वाना तलवारीने कापून काढले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दबा धरणार्यांनी त्वरा करून गिब्यावर छापा घातला आणि पुढे सरसावून सर्व नगराचा तलवारीने नाश केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे दबा धरून बसलेले होते त्यांनी अचानक गिबियाहवर हल्ला केला आणि ते शहरात पसरले आणि पूर्ण शहराचा तलवारीने नाश केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर दबा धरून बसणारे उठले आणि पटकन ते गिब्यात गेले आणि त्यांनी त्यांच्या तलवारीने नगरात राहणाऱ्या प्रत्येकाला ठार मारले.