Judges 20:42 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी इस्राएलांच्या तावडीतून सुटका करुन घेऊन पळ काढला. वाळवंटाच्या दिशेने ते पळू लागले पण लढाईतून त्यांची सुटका होईना. आता शहरांतून इस्राएल लोक बाहेर पडले आणि त्यांचा धुव्वा उडवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ते इस्राएल लोकांना पाठ दाखवून रानाकडे पळत सुटले; इस्राएल लोकांनी त्यांचा पिच्छा पुरवला; तसेच नगरातून बाहेर निघालेल्यांनी त्यांच्यामध्ये घुसून त्यांचा धुव्वा उडवला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून ते इस्राएली लोकांपुढून रानाकडे पळू लागले, परंतु युद्धापासून वाचू शकले नाही. आणि इस्राएली लोकांनी ते ज्या नगरातून निघाले होते त्यांना तिथेच ठार मारले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यास्तव ते इस्राएलाच्या सैन्यापुढून रानाच्या वाटेने निसटून पळाले; तथापि लढाईने त्यांना गाठले. इस्राएलाच्या सैन्याने बाहेर येऊन, जेथे कोठे ते गावातून बाहेर निघाले होते तेथे त्यांना मारले.