Judges 20:45 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जे वाचले त्यांतील काही रिम्मोन खडकाकडे पळून गेले. पण या वाटेवर इस्राएल लोकांनी त्यांचे पाच हजार सैनिक टिपले. गिदोमपर्यंत त्यांनी पाठलाग चालूच ठेवला. या ठिकाणी आणखी दोन हजार जणांना ठार मारले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
निसटलेले मात्र रिम्मोनाच्या खडकाकडे रानाच्या वाटेने पळून गेले. हमरस्त्यांवर गाठलेल्यांपैकी पाच हजार लोक इस्राएल लोकांनी टिपून मारले आणि गिदोमापर्यंत त्यांचा पिच्छा पुरवून त्यांतले आणखी दोन हजार लोक मारले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जसे ते मागे वळले आणि रानात रिम्मोनाच्या खडकाकडे पळाले, परंतु इस्राएली लोकांनी वाटेतच त्यांच्यापैकी पाच हजार पुरुषांना ठार केले आणि पुढे बिन्यामीन लोकांचा गिदोमापर्यंत पाठलाग करून त्यांचे आणखी पुरुष दोन हजार पुरुष मारून टाकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे मागे फिरले ते रानात रिम्मोन खडकाकडे पळून गेले. तथापि त्यांनी त्यातले पाच हजार पुरुष रस्त्यावर वेचून मारले, आणि गिदोमापर्यंत त्यांचा पाठलाग करून त्यातले दोन हजार पुरुष आणखी मारले.