Judges 21:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि इस्राएल लोकांनी बाराहजारांचे सैन्य याबेश-गिलादवर पाठवले. त्यांनी सैन्याला हुकूम केला, “तेथे जा आणि प्रत्येकाला तलवारीने कापून काढा अगदी बायका मुलांना सुध्दा सोडू नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा मंडळीने शूर अशा बारा हजार लोकांना तिकडे पाठवले; त्यांनी त्यांना आज्ञा केली, “तुम्ही जाऊन याबेश-गिलादाच्या रहिवाशांचा बायकापोरांसह तलवारीने संहार करा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून सभेने बारा हजार योद्ध्यांना सूचना देऊन याबेश-गिलआद येथे पाठविले आणि त्यांनी जाऊन तिथे राहणार्‍यांचा, स्त्रियांचा आणि लेकरांचा तलवारीने संहार करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मंडळीने शूर असे बारा हजार पुरुष सूचना देऊन याबेश गिलादाकडे पाठवले, “आणि तुम्ही जाऊन त्यांच्यावर हल्ला करा आणि स्त्रियांना व पुत्रांनासुद्धा तलवारीने मारा.