Judges 21:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यामुलींचे बाप किंवा भाऊ आमच्याकडे तक्रारी घेऊन येतील पण आम्ही म्हणू. ‘बन्यामीनांविषयी सहानुभूती बाळगा. करु द्या त्यांना लग्न. त्यांनी मुली नेल्या खऱ्या पण युध्द तर केले नाही आपल्याशी. शिवाय यात आपली शपथ मोडायचे पापही लागत नाही. कारण मुलींना त्यांनी आपणहून नेले. आम्ही मुली देणार नाही अशी तुमची प्रतिज्ञा होती. तिला धक्कालागलेला नाही. तुम्ही कोठे आपल्या मुलींची त्यांच्याशी लग्ने लावून दिलीत? बन्यामीनांनीच त्यांना तुमच्यातून उचलून नेले. तेव्हा तुमची शपथ मोडलेली नाही.”‘
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांचे वडील अथवा भाऊबंद तुमच्याकडे गार्हाणे घेऊन आले तर तुम्ही त्यांना सांगा, कृपया त्या दान म्हणून आम्हांला ठेवून घेऊ द्या; कारण त्या आमच्यासाठी बायका म्हणून आम्ही युद्धात घेतल्या नाहीत आणि तुम्हीही त्या आम्हांला दिल्या नाहीत, म्हणून तुम्हांला दोष लागत नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि जेव्हा त्यांचे वडील आणि भाऊ गार्हाणे घेऊन आमच्याकडे येतील, तेव्हा आम्ही त्यांना म्हणू, ‘आमच्यासाठी तुम्ही त्यांच्यावर कृपा करावी, कारण युद्धात आम्हाला त्यांच्यासाठी पत्नी मिळाली नाही. तुम्ही तुमची शपथ मोडल्याबद्दल दोषी ठरणार नाही, कारण तुम्ही तुमच्या कन्या त्यांना दिल्या नाहीत.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा त्यांचे वडील किंवा त्यांचे भाऊबंद एक होऊन आमच्याजवळ निषेध करण्यास येतील, तेव्हा आम्ही त्यांना सांगू, तुम्ही त्यांना राहू द्या, आमच्यावर कृपा करा! कारण लढाईत आम्हांला त्यांच्यातील एकएकासाठी पत्नी मिळाली नाही. आणि तुम्ही शपथेविषयी दोषी नाहीत, कारण तुम्ही स्वतः त्यांना तुमच्या मुली दिल्या नाहीत.”