Judges 21:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
या मेळाव्याला हजर नाही असा इस्राएलांपैकी कुठला वंश आहे का अशी चौकशी त्यांनी सुरु केली. मिस्पा येथे या मेळाव्याला जे कोणी येणार नाहीत अशांचा वध केला जाईल अशी गंभीर प्रतिज्ञा त्यांनी केली होती म्हणून त्यांनी कसोशीने हा शोध सुरु केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग इस्राएल लोक विचारपूस करू लागले, इस्राएलाच्या कोणत्याही वंशांपैकी परमेश्वरासमोर भरलेल्या मेळाव्याला आले नव्हते असे कोणी आहेत काय? कारण त्यांनी गंभीर प्रतिज्ञा केली होती, की, “जे मिस्पा येथे परमेश्वरासमोर येणार नाहीत त्यांना अवश्य जिवे मारावे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर इस्राएली लोकांनी हे विचारले, ते एकमेकास विचारू लागले, “इस्राएलाच्या सर्व गोत्रांमधून असा कोणी आहे, जो या सभेत याहवेहसमोर आला नाही?” कारण त्यांनी गंभीरतेने शपथ घेतली होती की, जो कोणी मिस्पाह येथे याहवेहसमोर उपस्थित राहणार नाही, त्याला अवश्य जिवे मारावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएली लोक म्हणाले, सर्व इस्राएली वंशांतला जो कोणी मंडळीत परमेश्वराजवळ चढून आला नाही, असा कोण आहे? कारण जो कोणी परमेश्वराजवळ मिस्पात चढून आला नाही. त्याविषयी अशी महत्त्वाची शपथ केली होती की, “ते म्हणाले, जे कोणी आले नाहीत त्यांना अवश्य जिवे मारावे.”