Judges 21:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पुढे ते म्हणाले, “मिस्पा येथे आज इस्राएलाच्या कोणत्या वंशाची गैरहजेरी आहे? येथे जमलेल्यात एक कोणीतरी दिसत नाहीत एवढे खरे!” मग त्यांच्या लक्षात आले की याबेश-गिलाद या शहरातून कोणीही आलेले नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी विचारपूस केली, “मिस्पा येथे परमेश्वरासमोर आले नव्हते असे इस्राएल वंशांतले कोण आहेत?” तेव्हा त्यांना कळले की, याबेश-गिलादाहून त्या मेळाव्यास हजर राहण्यासाठी कोणीही छावणीत आले नव्हते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर त्यांनी विचारले “मिस्पाह येथे याहवेहसमोर इस्राएलचा कोणता गोत्र आला नव्हता?” तेव्हा त्यांना कळून आले की, याबेश गिलआदातील लोकांपैकी कोणीही हजर नव्हते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी म्हटले, इस्राएलाच्या वंशांतला जो कोणी “मिस्पात परमेश्वर देवा जवळ चढून आला नाही; असा कोण आहे?” तेव्हा याबेश गिलादातला कोणीही मंडळीत आला नव्हता हे त्यांना कळले.