Judges 3:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने इतर राष्ट्रातील त्या लोकांना इस्राएलींचा प्रदेश सोडण्यास भाग पाडले नाही. परमेश्वराला इस्राएल लोकांची परिक्षा घ्यायची होती. या पिढीतील इस्राएल लोकांनी कनानातील देश काबीज करण्यासाठी लढाईत भाग घेतला नव्हता. तेव्हा त्या राष्ट्रांमधील लोकांना परमेश्वराने तेथेच राहू दिले. (कधी युद्ध माहीत नसलेल्या या इस्राएल लोकांना धडा शिकवण्यासाठी परमेश्वराने असे केले.) तेथे राहू दिलेल्या राष्ट्रांची नावे अशी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलांपैकी ज्यांना कनान देशातील युद्धांचा अनुभव नव्हता त्यांना कसास लावण्यासाठी
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कनानमधील युद्धांमध्ये भाग न घेतलेल्या इस्राएली लोकांची परीक्षा घेण्यासाठी याहवेहने या राष्ट्रांना त्या देशात राहण्याची परवानगी दिली
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएल लोकांस कनान देशांतील लढायांचा अनुभव नव्हता त्यांची परीक्षा पाहण्यासाठी परमेश्वराने काही राष्ट्रे देशात राहू दिली.