Judges 4:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सीसरा याएलला म्हणाला, “मला खूप तहान लागली आहे. आधी मला थोडे पाणी प्यायला दे.” याएलने त्याला, चामड्याच्या बुधल्यात ती दूध भरुन ठेवत असे ते प्यायला दिले. मग तिने त्याला पुन्हा लपवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला दे बरे! मला तहान लागली आहे.” तेव्हा तिने दुधाची बुधली उघडून त्याला दूध प्यायला दिले व त्याला झाकले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मला तहान लागली आहे,” तो तिला म्हणाला. “कृपा करून मला थोडेसे पाणी दे.” तेव्हा तिने त्याला दुधाची बुधली उघडून त्यातून त्याला थोडे दूध दिले आणि त्याला झाकून टाकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला दे. मला तहान लागली आहे.” तेव्हा तिने चामड्याची दुधाची पिशवी उघडून त्यास दूध प्यावयाला दिले व तिने त्यास पुन्हा झाकले.