Judges 4:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग याएलने तंबू ठोकायची मोठी मेख व हातोडी घेतली. व हळूच त्याच्याजवळ गेली. सीसरा खूप थकून गाढ झोपला होता. तिने ती मेख त्याच्या कानशिलाजवळ ठेवून हातोडीने ठोकली. त्याच्या डोक्यातून ती आरपार घुसून पार जमिनीत रुतली. सीसरा मरण पावला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग हेबेराची बायको याएल हिने डेर्याची मेख आणि हातोडा हाती घेऊन, आणि पाय न वाजवता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात ती मेख ठोकली; ती आरपार जाऊन जमिनीत रुतली. तो थकून गेल्यामुळे त्याला गाढ झोप लागली होती. अशा प्रकारे तो मेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सिसेरा थकून झोपलेला होता, परंतु हेबेराची पत्नी याएलने डेर्याची मेख आणि हातोडा घेतला आणि हळूच त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात तिने मेख ठोकली व ती आरपार जाऊन जमिनीत रुतून बसली आणि तो मरण पावला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग हेबेराची पत्नी याएल हिने डेऱ्याची मेख आणि हातोडा हाती घेऊन आली पाय न वाजविता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात ती मेख ठोकली; ती आरपार जाऊन जमिनीत रूतली, तो थकून गेल्यामुळे त्यास गाढ झोप लागली होती आणि तो तसाच मेला.