Judges 4:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेवढचात सीसराला शोधत बाराक याएलच्या तंबूपाशी पोहोंचला. याएल त्याला पाहून बाहेर गेली व म्हणाली, “आत या तुम्हाला हवा असलेला माणूस मी दाखवते.” तेव्हा याएल बरोबर बाराक आत शिरला तेथे त्याला मेख मारलेल्या अवस्थेत मरुन पडलेला सीसरा दिसला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाराक सीसराचा पाठलाग करत आला तेव्हा त्याला याएल सामोरी येऊन म्हणाली, “चला, ज्या माणसाचा तुम्ही शोध करत आहात तो मी तुम्हांला दाखवते.” तो तिच्याबरोबर आत जाऊन पाहतो तर सीसरा मरून पडला होता आणि त्याच्या कानशिलात मेख ठोकलेली होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाराक सिसेराचा शोध करीत आला, तेव्हा याएल त्याला सामोरी गेली व म्हणाली, “या, ज्या पुरुषाचा तुम्ही शोध करीत आहात, तो मी तुम्हाला दाखविते.” तो तिच्याबरोबर आत गेला, तेव्हा तिथे डेर्‍याची मेख कपाळातून आरपार जाऊन सिसेरा मरून पडलेला त्याला दिसला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाराक सीसराचा पाठलाग करीत आला तेव्हा त्यास याएल सामोरी येऊन म्हणाली, “चला, ज्या मनुष्याचा तुम्ही शोध करीत आहा तो मी तुम्हाला दाखवते.” तो तिच्यासोबत आत जाऊन पाहतो तो सीसरा मरून पडला होता आणि त्याच्या कानशिलात मेख ठोकलेली होती.