Judges 5:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
उरलेल्या मानकऱ्यांनो आता आपल्या नेत्यांकडे जा. परमेश्वराचे लोकाहो. तुम्ही माझ्यासाठी सैनिकांबरोबर जा. परमेश्वराने इस्राएलच्या वीरांना विजय मिळवून दिला. इस्राएलमधील जिवंत राहिलेले लोक बलवान लोकांवर विजयी झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा उरलेले सरदार खाली उतरले; परमेश्वराचे लोक माझ्यासाठी वीरांविरुद्ध सामना करायला उतरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“राहिलेले सरदार खाली आले; याहवेहचे लोक बलवान लोकांविरुद्ध माझ्याकडे आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा उरलेले सरदार खाली उतरले; परमेश्वराचे लोक माझ्याकरिता वीरांविरुद्ध सामना करावयास उतरले.