Judges 6:35 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मनश्शेच्या वंशातील सर्व लोकांकडे त्याने दूत रवाना केले. दूतांनी त्या लोकांना शस्त्रास्त्रे घेऊन युध्दासाठी सज्ज राहायला सांगितले. आशेर, जबुलून आणि नफताली यांच्या कडेही गिदोनने आपल्या दूतांकरवी असाच निरोप पाठवला. तेव्हा तेही सर्व लोक गिदोनला येऊन मिळाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्याने मनश्शेत सर्वत्र जासूद पाठवले तेव्हा तेही त्याला येऊन मिळाले. त्याप्रमाणेच आशेर, जबुलून व नफताली ह्यांच्याकडे त्याने जासूद पाठवले, आणि तेही त्याला येऊन मिळण्यासाठी निघाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने मनश्शेह, आशेर, जबुलून आणि नफतालीकडे दूत पाठवून त्यांच्या सैन्यांना येण्याचे आव्हान केले व त्या सर्वांनी त्याला साथ दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्याने सगळ्या मनश्शेत जासूद पाठवले तेव्हा तेही त्याच्याजवळ एकत्र झाले; नंतर आशेर व जबुलून व नफतालीत त्याने जासूद पाठवले, तेव्हा ते त्यांच्याशी मिळायला चढून गेले.