Judges 7:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यरूब्बाल (म्हणजेच गिदोन) आणि त्याच्या बरोबरचे सर्व लोक यांनी सकाळी लवकर उठून हरोद झऱ्याजवळ तळ दिला. आणि मिद्यानी लोकांचा तळ मोरे नावाच्या डोंगराच्या पायथ्याजवळ एका खोऱ्यात होता. हे ठिकाण गिदोनच्या तळाच्या उत्तरेस होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग यरुब्बाल म्हणजे गिदोन आणि त्याच्याबरोबरचे सर्व लोक ह्यांनी पहाटेस उठून एन-हरोद1 येथे तळ दिला; त्यांच्या उत्तरेस मोरे टेकडीजवळील खोर्यात मिद्यानाची छावणी होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अगदी पहाटेस यरूब्बआल (म्हणजे गिदोन) आणि त्याचे सर्व लोक हरोदाच्या झर्यापर्यंत गेले. मिद्यान्यांचा तळ त्यांच्या उत्तरेस मोरेह डोंगराजवळ खोर्यात होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग यरूब्बाल म्हणजे गिदोन आणि त्याच्याबरोबरचे जे सर्व लोक ह्यांनी सकाळी उठून हरोदा झऱ्याजवळ तळ दिला, आणि मिद्यानी लोकांची छावणी मोरे डोंगराच्या उत्तर खोऱ्यात होती.