Judges 7:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शत्रूतळाशी येताच गिदोनला एकाचे बोलणे ऐकू आले. आपल्याला काय स्वप्न पडले ते तो आपल्या मित्राला सांगत होता. “पावाची एक गोल लादी मिद्यानी लोकांच्या तळापाशी घरंगळत आली. आणि तंबूला तिने इतक्या जोरात धक्का दिला की तंबू उलटला आणि पार आडवा झाला.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गिदोन तेथे गेला तेव्हा एक जण आपल्या सोबत्याला आपले स्वप्न सांगत होता; तो म्हणाला, “ऐक, मी स्वप्नात पाहिले की, सातूची एक भाकर घरंगळत मिद्यानाच्या छावणीत येऊन पडली. तिने डेर्‍याला असा धक्का दिला की तो पडला; तो उलटून पडला व भुईसपाट झाला.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गिदोन तिथे पोहोचला तेव्हा एक मनुष्य आपल्या सोबत्याला स्वप्न सांगत होता. तो म्हणत होता, “मला एक स्वप्न पडले, एक जवाची गोल भाकर घरंगळत मिद्यानी छावणीत आली. तिने आपल्या तंबूला असा जोराचा धक्का दिला की तो तंबू उलटला आणि जमिनीवर भुईसपाट झाला.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग गिदोन गेला आणि पाहा, कोणी आपल्या सोबत्याला असे स्वप्न सांगत होता की, “पाहा, मी एक स्वप्न पाहिले, सातूची गोल भाकर मिद्यानी तळात घरंगळत येऊन एका तंबूपर्यंत आली आणि तिने असा जोराचा धक्का दिला की, तो तंबू पडला आणि उलटून भुई सपाट झाला.”