Judges 7:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग गिदोनने आपल्या तीनशे माणसांचे तीन गट केले. प्रत्येकाला एक रणशिंग आणि एक रिकामा घडा दिला. घडचामध्ये पेटती मशाल होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने त्या तीनशे लोकांच्या तीन तुकड्या केल्या; त्या सर्वांच्या हातांत त्याने रणशिंगे व रिकामे घडे दिले; त्या घड्यांच्या आत दिवट्या ठेवल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग गिदोनाने आपल्या तीनशे सैनिकांच्या तीन तुकड्या केल्या आणि प्रत्येकाला एक रणशिंग व मातीचे एक रिकामे मडके दिले, त्या मडक्यात एकेक मशाल होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा त्याने त्या तीनशे मनुष्यांच्या विभागून तीन टोळ्या केल्या, आणि त्यांना सर्व कर्णे दिले आणि रिकामे मडके देऊन त्या मडक्यांमध्ये दिवे दिले होते.