Judges 7:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एफ्राईमच्या डोंगराळ भागात गिदोनने सर्वत्र आपले दूत पाठवले. निरोप असा होता “खाली या आणि मिद्यान्यांवर हल्ला करा. बेथ-बारा आणि यार्देन नदीपर्यंतचा प्रदेश रोखून धरा. मिद्यानी लोकांना निसटू देऊ नका.” तेव्हा एफ्राईमच्या वंशातील लोकांना त्यांनी बोलावले. त्यांनी बेथ-बारापर्यंत नदीलगतच्या प्रदेशाचा ताबा घेतला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गिदोनाने एफ्राइमाच्या सर्व डोंगराळ प्रदेशात जासूद पाठवून लोकांना सांगितले की, “मिद्यान्यांना अडवायला या आणि बेथ-बारापर्यंत यार्देन नदीचे उतार रोखून धरा.” त्याप्रमाणे एफ्राइमाच्या सगळ्या लोकांना बोलावण्यात आले आणि त्यांनी बेथ-बारापर्यंतचे उतार रोखून धरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गिदोनाने एफ्राईमच्या सर्व डोंगराळ प्रदेशात आपले दूत पाठवून हा संदेश दिला, “खाली येऊन मिद्यानाशी लढून बेथ-बाराहपर्यंत यार्देन नदीचे उतार रोखून धरा.” म्हणून एफ्राईमच्या सर्व लोकांना बोलाविण्यात आले आणि त्यांनी बेथ बारापर्यंत यार्देन नदीचा उतार रोखून धरला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गिदोनाने एफ्राईमाच्या सर्व डोंगराळ प्रदेशात जासूद पाठवून सांगितले की, “तुम्ही खाली जाऊन बेथ-बारापर्यंत यार्देन नदीवर नियंत्रण मिळवा आणि मिद्यानी लोकांस आडवा.” म्हणून एफ्राईमाचे सर्व लोक एकत्र आले आणि त्यांनी बेथ-बारापर्यंत यार्देन नदी पार करण्याच्या सर्व वाटा रोखून धरल्या.