Judges 7:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एफ्राईम लोकांनी दोन मिद्यानी नेत्यांना पकडले, ओरेब आणि जेब हे दोन नेते होत. ओरेबचा खडक या ठिकाणापाशी त्यांनी ओरेबला मारले. जेबला जेबचे द्राक्षकुंड येथे मारले. एफ्राईम लोकांनी मिद्यान्याचा पाठलाग सुरुच ठेवला. ओरेब आणि जेब यांची मुंडकी त्यांनी गिदोनला दाखवायला नेली. यार्देन नदीपलीकडे गिदोन होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी मिद्यानाचे ओरेब व जेब ह्या नावांचे दोन सरदार पकडले; त्यांनी ओरेबाला ओरेबाच्या खडकावर जिवे मारले व जेबाला जेबाच्या द्राक्षकुंडाजवळ जिवे मारले आणि मिद्यानांचा पाठलाग केला; त्यांनी ओरेब व जेब ह्यांची मुंडकी यार्देनेपार गिदोनाकडे नेली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी ओरेब व जेब नावांच्या दोन मिद्यानी पुढार्‍यांनाही पकडले. त्यांनी ओरेबाला ओरेबाच्या खडकावर मारले आणि जेबाला जेबाच्या द्राक्षकुंडाजवळ मारले. मग इस्राएली लोकांनी मिद्यानांचा पाठलाग केला आणि ओरेब व जेब यांची शिरे यार्देनेपलीकडे गिदोनाकडे आणली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी ओरेब व जेब हे मिद्यान्यांचे दोन सरदार पकडले. ओरेबाला त्यांनी ओरेबाच्या खडकावर ठार मारले, आणि जेबाला जेबाच्या द्राक्षकुंडात ठार मारले. त्यांनी मिद्यान्यांचा पाठलाग गेला व ओरेब व जेब ह्यांची मुंडकी यार्देनेच्या पलीकडे असलेल्या गिदोनाकडे आणली.