Judges 7:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा आता एक गोष्ट जाहीर कर. त्यांना सांग, “कोणी लढाईला घाबरत असेल तर त्याने आत्ताच गिलाद डोंगर सोडून घरी परत जावे.” त्यावेळी बावीस हजार माणसे गिदोनला सोडून गेली. तरी दहाहजार राहिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून आता लोकांना ऐकू जाईल असे जाहीर कर की, ज्याला भीती वाटत असेल किंवा जो घाबरट असेल त्याने गिलाद डोंगरावरून निघून परत जावे.” तेव्हा त्यांच्यातून बावीस हजार लोक परत गेले आणि दहा हजार राहिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता सैन्यांना सूचना दे, ‘जर कोणी घाबरत असतील, तर त्यांनी गिलआद डोंगरावरून माघारी जावे.’ ” त्यामधून बावीस हजार लोक परत गेले व दहा हजार राहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आता तू लोकांच्या कानी जाईल असे जाहीर करून सांग की, ‘जो कोणी भित्रा आणि घाबरट आहे,’ त्याने गिलाद डोंगरावरून निघून परत माघारी जावे.” तेव्हा लोकांतून बावीस हजार लोक माघारी गेले आणि दहा हजार राहिले.