Judges 7:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा परमेश्वर गिदोनला म्हणाला, “ही देखील फार आहेत. त्यांना घेऊन खाली झऱ्याशी जा मी त्यांची परीक्षा पाहतो. “याने तुझ्या बरोबर यावे” असे मी म्हणीन त्याच माणसाने तुझ्याबरोबर जावे. ज्याने जाऊ नये असे सांगीन तो तुझ्याबरोबर येणार नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “अजूनही लोक फार आहेत; त्यांना पाणवठ्यावर घेऊन चल, म्हणजे तेथे मी तुझ्या वतीने त्यांना पारखीन. मी तुला सांगेन की अमक्याने तुझ्याबरोबर जावे तर त्याने तुझ्याबरोबर जावे, आणि मी तुला सांगेन अमक्याने तुझ्याबरोबर जाऊ नये तर त्याने जाऊ नये.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु याहवेह गिदोनास म्हणाले, “अजूनही पुष्कळ लोक आहेत. त्यांना पाण्याजवळ घेऊन चल आणि तिथे मी त्यांना पारखून त्यांची संख्या तुझ्यासाठी कमी करेन. जर मी म्हणालो, ‘हा तुझ्याबरोबर जाईल,’ तो तुझ्याबरोबर जाईल; पण जर मी म्हणालो, ‘हा तुझ्याबरोबर जाऊ नये,’ तर त्याने तुझ्याबरोबर जाऊ नये.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “अजूनही लोक फार आहेत; तू त्यांना खाली पाण्याजवळ ने, आणि तेथे मी तुझ्यासाठी त्यांची कसोटी घेईन. ज्याच्याविषयी मी तुला सांगेन, त्याने तुझ्याबरोबर यावे तो तुझ्याबरोबर जावो, आणि ज्या प्रत्येकाविषयी मी तुला सांगेन की, त्याने तुझ्याबरोबर न यावे, तो न जावो.”