Judges 7:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा गिदोनने बाकीच्यांना परत पाठवून तीनशे जणांना आपल्या बरोबर राहू दिले. जे परत गेले त्यांची शस्त्रसामुग्री आणि रणवाद्ये तीनशे जणांनी ठेवून घेतली. गिदोनच्या तळाच्या खालच्या खोऱ्यातच मिद्यानी लोकांचा तळ होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्या लोकांनी अन्नसामग्री व लोकांकडली रणशिंगे हाती घेतली; त्याने बाकीच्या सर्व इस्राएल लोकांना आपापल्या डेर्यांकडे पाठवून दिले, पण त्या तीनशे लोकांना मात्र ठेवून घेतले. मिद्यानाची छावणी खाली खोर्यात होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गिदोनाने बाकीच्या इस्राएली लोकांना घरी पाठवून दिले, परंतु त्याच्याजवळ फक्त तीनशे लोकच ठेवले, ज्यांनी इतरांकडून अन्नसामुग्री व रणशिंगे घेतली. त्याच्या खाली खोर्यात मिद्यानी लोक आपल्या छावणीत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या हाती अन्नसामग्री व त्यांची रणशिंगे घेतली, आणि त्याने इस्राएलाची बाकीची सर्व माणसे त्यांच्या तंबूकडे पाठवली; केवळ ती तीनशे माणसे ठेवली. तेव्हा मिद्यान्यांचा तळ त्यांच्या खाली खिंडीत होता.