Judges 8:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एफ्राईम लोक गिदोनवर चिडले होते. त्यामुळे गिदोनला भेटले तेव्हा त्यांनी विचारले, “तू मिद्यान्यांवर चढाई केलीस तेव्हा आम्हाला का बोलावले नाहीस? आम्हाला तू वागणूक का दिलीस?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा एफ्राइमी पुरुष त्याला म्हणाले, “तू आमच्याशी असा का वागलास? तू मिद्यानाशी लढायला निघालास तेव्हा आम्हांला का बोलावले नाहीस?” अशी ते त्याच्याशी हुज्जत घालू लागले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता एफ्राईमचे लोक गिदोनाला म्हणाले, “तू आमच्याशी असा का वागला? जेव्हा तू मिद्यानी लोकांशी युद्ध करावयास गेला तर आम्हाला का बोलाविले नाही?” आणि त्यांनी रागात गिदोनासह वाद घातला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा एफ्राइमी माणसे गिदोनाला म्हणाली, “तू हे आमच्याशी काय केले? तू मिद्यानाशी लढावयाला गेलास तेव्हा आम्हांला का बोलावले नाहीस?” असे ते त्याच्याशी जोरदारपणे वादविवाद करू लागले.